











गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या विविध योजना आणि उपक्रम येथे सादर केले आहेत. प्रत्येक उपक्रमाचा उद्देश ग्रामस्थांचे जीवनमान उंचावणे आणि गावाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करणे हा आहे.
गावात लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, सुलभ सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये काम करणे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ग्रामस्तरावर रोजगाराची हमी देणारी महत्त्वाची योजना आहे.
प्रधानमंत्री, रमाई आणि दिव्यांग आवास योजना या योजनांचा उद्देश गरजू नागरिकांना सुरक्षित व सुसज्ज घर उपलब्ध करून देणे आहे.
जिल्हा वार्षिक योजना ही जिल्ह्याच्या विकासासाठी निर्धारित उद्दिष्टे आणि प्राधान्ये ठरविणारी महत्त्वाची योजना आहे.
१५ वा वित्तआयोग हे राज्य आणि केंद्र सरकार दरम्यान आर्थिक वितरणाचे न्यायसंगत आणि पारदर्शक नियोजन करणारे महत्त्वपूर्ण आयोग आहे.
हे गावातील स्वच्छता सुधारण्यासाठी आणि लोक जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरु करण्यात आले आहे.
प्रत्येक घरात नळ कनेक्शनद्वारे सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय अभियान आहे.
माझी वसुंधरा अभियान हे पर्यावरण संरक्षण आणि सेंद्रिय कचरा व्यवस्थापनासाठी राबवले जाणारे एक महत्त्वाचे अभियान आहे.
अ. जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, गटर्स, अंतर्गत रस्ते, मलनिस्सारण आणि समाजमंदिर आदी पायाभूत सुविधांचा विकास करणे.
ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या पातळीत सुधारणा करणे व गावे हागणदारीमुक्त करणे यासाठी वैयक्तिक/ सार्वजनिक स्वच्छतागृहे/ शाळा व अंगणवाड्यांमध्ये शौचालये, घन व द्रव कचरा व्यवस्थापन यंत्रणा उभारणे.